Inspirational Book Award to Docter Prachiti Punde

करमाळा (सोलापूर) : इंग्रजी साहित्य लेखन करणाऱ्या डॉ. प्रचिती पुंडे यांना एक दिवसीय इंग्रजी भाषा कार्यशाळेमध्ये ‘इंस्पीरेशनल बुक अॅवार्ड’ हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी यशकल्याणीचे गणेश करे पाटील, समुपदेशक डॉ. सुनिता दोषी, संगमेश्वर महाविद्यालयचे प्रा. डॉ. धनाप्पा मेत्री, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळचे इंग्रजी भाषा तज्ञ प्रा. श्रीधर नागरगोजे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, इंग्रजी विषय संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मुचंडे, प्रा. भिष्माचार्य चांदणे उपस्थित होते.

पंचायत समितीचे इंग्रजी विषय समन्वयक रेवण्णाथ आदलिंग, नवनियुक्त सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, इंग्लीश टीचर्स असोसिएशन करमाळा तालुका अध्यक्ष कल्याणराव साळुंके, सचिव गोपाळराव तकीक- पाटील, सहसचिव मारूती जाधव, प्रसिद्धी प्रमुख सुखदेव गिलबिले, प्रा. विष्णू शिंदे, प्रा. जयेश पवार उपस्थित होते.

पंचवीसहून अधिक पुस्तके लिहीणाऱ्या डॉ. पुंडे यांनी आपल्या लेखनात मनाचे आरोग्य या विषयी सविस्तर लेखन केलेले आहे. याची दखल घेत या वर्षीचा इंस्पीरेशनल बूक अॅवार्ड 2024 देऊन त्यांना सन्मान करण्यात आले. यापुढे करमाळा तालुक्यातील इंग्रजीतून लेखन करणाऱ्या लेखकांना यशकल्याणी संस्थेच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जाणार असल्याचे प्रा. डॉ. करे पाटील यांनी जIहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुखदेव गिलबिले, प्रा. विष्णू शिंदे, प्रा. बाळकृष्ण लावंड यांनी केले तर आभार सहसचिव प्रा. मारूती जाधव यांनी मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *