करमाळा बाजार समिती बिनविरोध! ‘हे’ आहेत नुतन संचालक

Eight supporters of MLA Sanjay Shinde group withdraw from Karmala Bazar Committee

करमाळा (अशोक मुरुमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक बिनविरोध झाली आहे. मोहिते पाटील यांनी केलेल्या जगताप, पाटील व बागल यांच्यातील समझोता आणि शिंदे गटाने जगताप यांना दिलेला पाठिंबा यामुळे हे शक्य झाले आहे. अतुल खुपसे व भाजपचे उमेदवार काय निर्णय घेतील याची उत्सुकता लागलेली असताना शेवटच्याक्षणी ही निवडणुक बिनविरोध झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले. १८ पैकी १८ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

हे आहेत बिनविरोध उमेदवार
सहकारी संस्थामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभुराजे जगताप, विलास गुंडगीरे, सागर दोंड, जनार्धन नलवडे, तात्यासाहेब शिंदे, महादेव कामटे.

महिला राखीव : साधना पवार, शौलजा मेहर. इतर मागासवर्ग : शिवजी राखुंडे. भटक्या जमाती : नागनाथ लकडे. ग्रामपंचायत : कशीनाथ काकडे, नवनाथ झोळ, बाळू पवार, कुलदीप पाटील. व्यापारी प्रतिनीधी : मनोज पितळे व परेशकुमार दोशी. हमाल तोलार : वालचंद रोडगे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *