करमाळा भुईकोट किल्ला संवर्धनाचे काम वेगात

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्याचे काम सुरु आहे. यासाठी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन मंडळामधून २ कोटी निधी मिळविला होता.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व माढा तालुक्यांबरोबरच धाराशिव जिल्ह्यातील परांडा, भूम भागावर राजे रावरंभा निंबाळकर यांची सत्ता होती. करमाळ्यातील कमलादेवीचे मंदिर व भुईकोट किल्ला याची बांधणी राजे जानोजी, रंभाजी (रावरंभा) निंबाळकर यांनी १७ व्या शतकात केली. या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. याचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरणाचे काम ऑगस्ट २०२४ पासून सुरू आहे.

शहराचा हा ऐतिहासिक वारसा जतन होण्यासाठी या संपूर्ण किल्ल्याची डागडुजी होण्यासाठी आणखी निधी शिंदे यांनी उपलब्ध करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *