करमाळा (सोलापूर) : सोलापूर कोर्टकर्मचारी आयोजित ‘सोलापूर कोर्ट प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेमध्ये करमाळा कोर्ट संघाने प्रथम पारितोषिक व चषक मिळवला. या स्पर्धेमध्ये सोलापूर शहर न्यायालीन कर्मचारी व न्यायाधीश तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोर्टकर्मचारी, न्यायाधीश व प्रत्येक तालुक्यातील दोन ऍडव्होकेट सदस्य सहभागी होते.

प्रत्येकी संघामध्ये मिळून सदरील स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील न्यायमूर्ती यांचा संघ मिळून 16 संघामध्ये ही स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये करमाळा कोर्ट संघाने सोलापूर येथील डिस्टिक डायमंड सोलापूर संघावर फायनलमध्ये मात करून पहिल्या क्रमांकाचे रोख स्वरूपातील रक्कम व मानाचा चषक हे विजेतेपद पटकावलं.

स्पर्धेमध्ये करमाळा कोर्टाकडून स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ऍड. अमर शिंगाडे तसेच कॉटर फायनल व सेमी फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार ऍड. शिंगाडे व फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोर्ट कर्मचारी मधुसूदन धोत्रे व नॉकआउट मॅच मध्ये मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार कोर्ट कर्मचारी उडचंन तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये कर्णधार सचिन कोकरे, शशिकांत शेजुळ, अमोल राऊत, संतोष ओघे, सज्जन यादव, कुंभार, ऍड. शेरे, बारस्कर, कोंडलकर यांनी उत्कृष्ट खेळी करून संघासाठी योगदान दिले.

करमाळा कोर्ट चषकाचा पुरस्कार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज जी चव्हाण तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला व सोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सलमान आझमी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व न्यायमूर्ती व कर्मचारी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *