मद्यप्राशनकरून ट्र्क चालविणाऱ्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा

करमाळा (सोलापूर) : करमाळा- नगर रस्त्यावर नालबंद मंगल कार्यालय परिसरात मद्यप्राशनकरून ट्र्क चावणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. एन. वेलमुरगण (वय 40, रा. वेलूर, स्ट्रीट सीरपल्ली पोस्ट, राशीपूरम, जि. नमक्कल) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल दीपक कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित आरोपी हा अडखळत गाडी चालवत होता. तेव्हा त्याचा संशय आल्याने पोलिसानी त्याला गाडी बाजूला घेईला सांगितले. तेव्हा त्याच्या तोंडाची वास येत होती. त्याची तपासणी केली तेव्हा त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *