करमाळा पोलिसात एकाच दिवशी तीन व्यक्ती हरवल्याची नोंद; दोन मुलींसह एका तरुणाचा समावेश

Karmala police report that three persons were missing in one day

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात आज (शनिवारी) एकाच दिवशी तीन व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात झाली आहे. यामध्ये दोन मुली व एका तरुणाचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्या तीनही व्यक्ती तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील आहेत.

करमाळा तालुक्यात शनिवारी (ता. १) तीन व्यक्ती हरवल्या असल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. यामध्ये देवळाली येथील राहते घरातुन (नागोबाचे मंदीराजवळ) येथून २४ वर्षाचा तरुण हरवला आहे. याची नोंद करमाळा पोलिसात झाली आहे. याशिवाय मोरवड येथील राहाते घरातुन २२ वर्षाची एक मुलगी बेपत्ता झाली आहे. याची नोंद करमाळा पोलिसात हरवले असल्याची नोंद झाली आहे. तिसरी व्यक्ती हिसरे येथून बेपत्ता झाली आहे. हिसरेतील राहते घरातुन 20 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली असल्याची नोंद करमाळा पोलिसात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *