Even after eight days no action has been taken in the theft of sand from Bitargaon SriEven after eight days no action has been taken in the theft of sand from Bitargaon Sri

करमाळा : तालुक्यातील बिटरगाव श्री येथील वाळू चोरीप्रकरणी आठ दिवस झाले तरी कारवाई झालेली नाही. तलाठी विवेक कसबे यांनी वाळू चोरीचा पंचनामा केला होता. त्याचा अहवाल त्यांनी प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्याकडे दिला आहे, मात्र त्यावर अजून काहीच कारवाई झालेली नाही. या पंचनाम्यात वाळू चोराचे नावही आहे तरी यामध्ये कारवाई करण्यास विलंब का होत आहे, असा प्रश्न ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भाऊसाहेब मुरूमकर यांनी केला आहे.

बिटरगाव श्री सीना नदीत वाळू उपसा करण्यास परवानगी नाही. तरीही कायद्याचा धाक राहिला नसल्याने वाळू चोर हा बेकायदा वाळू उपसा करत आहे. त्याला तक्रारदाराने वाळू उपसा करताना पाहिले आहे. त्यावरून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. तो पंचनामा तहसील कार्यालयात देण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करावी अन्यथा गावात दोन गटात वाद होईल. याला प्रशासन जबाबदार, असेल असे मुरूमकर यांनी म्हटले आहे. दरम्यान सोमवार किंवा मंगळवारी संबंधित वाळू चोराला नोटीस देऊन कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून समजत आहे. यामध्ये काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *