जरांगेंचा आदेश मानत आमदार शिंदे यांना जाहीर पाठिंबा! विकासाला साथ देत करमाळ्यात दोघांची निवडणूकीतून माघार

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मराठा सेवा संघाचे तालुका माजी तालुका अध्यक्ष डॉ. सुजितकुमार शिंदे यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आदेश प्रमाण मानून उमेदवारी अर्ज माघारी घेऊन मराठा मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच सुहास ओहोळ यांनीही आपला अर्ज माघारी घेऊन आमदार शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना डॉ. शिंदे व ओहोळ म्हणाले की आमदार शिंदे हे विकासप्रिय आमदार आहेत. त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदेश प्रमाण मानून आपण हा निर्णय घेतला असून फक्त पाठिंबा देण्यापुरते आम्ही मर्यादित राहणार नसून आमदार शिंदे यांचा जाहीर प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठीही 24 तास प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी डॉ. सुजितकुमार शिंदे, सुहास ओहोळ या उमेदवारांबरोबरच प्रवीण पाटील , सुजित बागल, तात्या पाटील, पै. अनिल पवार, गौतम ढाणे, सतीश पाटील ,किसन पिंपरे, सोमा लांडे, बबन चोरमले, भाऊ साहेब शेळके, पैलवान अमोल गायकवाड, दिलीप बागल, नानासाहेब नलावडे, युवराज गपाट, मनोहर रंदवे, आबासाहेब ननवरे, अभिजीत ननावरे, अमोल चाळक, महेश काळे, विनय ननवरे, आजिनाथ मोरे, दिगंबर झिंजाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *