करमाळ्याच्या पोस्टात आता आयटी 2.0 प्रणाली, प्रशिक्षण पूर्ण

करमाळा : करमाळा पोस्ट कार्यालयात सोमवारपासून (ता. ४) आयटी 2.0 ही नवीन प्रणाली सुरु होणार आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती करमाळा उपविभाग डाक निरीक्षक लक्ष्मण शेवाळे व सबपोस्ट मास्टर उदय बंडगर यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोस्ट विभागअंतर्गत आयटी 2.0 ची नवीन कार्यप्रणाली कार्यान्वित होत आहे. या परिवर्तनात्मक उपक्रमाचा भाग म्हणून सुधारित प्रणालीबाबत करमाळा टपाल कार्यालयांमध्ये प्रक्षिण देण्यात आले आहे. आयटी 2.0 (Advance Portal Technology, IT 2.0) ही रोलआउट वापरकर्त्यासाठी सुलभ अनुभव, जलद सेवा आणि अधिक ग्राहकाभिमुख इंटरफेस देण्यासाठी डिझाइन करण्याता आला आहे. त्यामुळे कार्यक्षम, स्मार्ट आणि भविष्यकालीन टपाल सेवांसाठीच्या कटिबध्दतेचे प्रतिबिंब दिसून येत आहे. ही पावले अधिक चांगल्या, जलद व डिजिटलदृष्टया सक्षम सेवसाठी उचचली जात आहेत, असे सागितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *