करमाळा (सोलापूर) : येथील कृष्णा हॉस्पिटलमधील स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता कांबळे यांचा वर्ल्ड कॉन्स्टिटीयूशन अँड पार्लमेंट असोसिएशनने गौरव केला आहे. डॉ. कांबळे यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे. वर्ल्ड कॉन्स्टिटीयूशन अँड पार्लमेंट असोसिएशन ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. डॉ. कांबळे यांना एचपीव्ही लसीकरणाच्या जागृतीसाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 15 वर्षापासून डॉ. कांबळे यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे. सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन हा गौरव करण्यात आला.



