करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे येथील ढेकळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले आहे. मुलांनी मोबाईलवरील गेम न खेळता प्रत्यक्षात मैदानावर खेळ खेळावेत या हेतूने व त्यांना खेळाचे महत्त्व समजावे या जाणिवेतून लोकसहभागातून स्पोर्ट् ड्रेस खरेदी करून त्याचे आज (गुरुवारी) वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष झिंजाडे, भाऊसाहेब जाधव, भाऊसाहेब साळुंके, लालासाहेब ठोंबरे उपस्थित होते. मुख्याध्यापक नितीन रंदवे व सहशिक्षक चंद्रकांत रोडे यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४