करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ फाऊंडेशनच्या वतीने महाराजस्व अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे विविध दाखले काढण्यासाठी एकदिवसीय शिबीर होणार आहे. केत्तूर नं. १ येथील दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्यू. कॉलेज येथे हे शिबीर होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे मिळवण्यासाठी मानसिक त्रास होऊ नये म्हणून शिबीर घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन प्रा. रामदास झोळ फाऊंडेशनचे सर्वेसर्वा आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून बुधवारी (ता. ५) सकाळी ११ ते ५ या वेळेत हे शिबीर होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमीसाईल, नॉन क्रिमीलेयर, ईडब्ल्यूएस, नावात किंवा जन्म तारखेत बदल इत्यादी दाखले मिळणार आहेत. परिसरातील गरजू पालक व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे.