करमाळा (सोलापूर) : बालाजी अमाईन्सच्या वतीने कोर्टी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा १३६ विद्यार्थ्यांना लाभ झाला. सीएसआर विभाग प्रमुख अनिल विपट आणि सीएसआर असिस्टंट मॅनेजर दत्तप्रसाद संजेकर यावेळी उपस्थित होते.
कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, शालेय साहित्य संच, इतर शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. कंपनीचे प्रतिनिधी अनिल विपट म्हणाले, ‘आपत्तीच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, हीच आमची सामाजिक बांधिलकी आहे. शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून बालाजी अमाईन्सने पुढाकार घेतला आहे.’ शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांचे आणि बालाजी अमाईन्सचे आभार मानले. ‘पूरामुळे अनेक विद्यार्थ्यांचे साहित्य नष्ट झाले होते. अशा वेळी मिळालेली ही मदत विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार आहे,’ असे ते म्हणाले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहताना दिसला. पालक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कृषी अधिकारी निळकंठ अभंग, सुभाष अभंग, बाळासाहेब शिंदे, रिजवाना शेख, विषयतज्ञ विक्रम शेंबडे उपस्थित होते. या उपक्रमाबाबत करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कदम, शिक्षण विस्तार अधिकारी श्री नलवडे, श्री टकले, मॅनेजिंग डायरेक्टर राम रेड्डी यांचे आभार मानले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप शेरे, उपाध्यक्ष दीपक माने, सरपंच भाग्यश्री नाळे मेहेर यांनी कौतुक केले.
