करमाळा : महाराष्ट्र बँकेच्या पंतप्रधान जिवन सुरक्षा योजनेत उल्लखनीय कामगिरी केल्याबद्दल येथील बाळकृष्ण कुलकर्णी यांचा सोलापूर येथे गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्र बँकेच्या सोलापूर येथील झोनल शाखेत सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन हा गौरव झाला आहे. यावेळी झोनल मॅनेजर संजय वाघ, श्री. घाडगे आदी उपस्थित होते. या गौरवाबद्दल करमाळा शाखेचे व्यवस्थापक शशांक कुमार, सहाय्यक व्यवस्थापक अविनाश पेंटे, हेड कॅशीअर ज्योतिराम दुर्गुळे, प्रविण जाधव, नवनाथ देमुंडे, बलभिम बागल, अश्विनी घोडके यांनी अभिनंदन केले.


