करमाळा (सोलापूर) : प्रतिक्षेत असलेल्या कुकडी डावा कालवा अंतर्गत पोंधवडी शाखा कालवा हुलगेवाडी चारीच्या कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी ९ कोटी २३ लाख निधी मंजूर झाला होता. आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले असून वेळेपूर्वीच पूर्ण होऊन कुस्करवाडी चारीतून चाचणीचे पाणी ३ ऑगस्ट २०२३ रोजी सोडले होते. त्यावेळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी पाणी पूजन करून आनंदोत्सव साजरा केला केला होता. परंतु या चारयांमधून गळती होत होती. त्याचे अस्तरीकरण करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार पाठपुरावा करून आमदार शिंदे यांच्या प्रयत्नाने पोंधवडी चारीच्या अस्तरीकरणाला सुरुवात झाली आहे.
या कामाची सुरुवात कोर्टी ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाली आहे. यावेळी सेवा निवृत्त कृषी अधिकारी निलकंठ अभंग, संजय जाधव, कुकडी पाटबंधारे विभागचे अभियंता श्रीरंग मेहेर, उपसरपंच नानासाहेब झाकणे, आप्पा शेरे, हनुमंत जाधव, मकाईचे संचालक संचालक आशिष गायकवाड, विकास गावडे, दादा गावडे, शशिकांत गावडे, रुपचंद गावडे, भय्या इनामदार, मनोहर शेरे, मोहन गावडे, नागेश जाधव, राजाभाऊ शितोळे, मुन्ना शेख उपस्थित होते.