करमाळा (सोलापूर) : येथील महाराष्ट्र बँकेत पोथरे व बिटरगाव श्री येथील १० बचत गटातील महिलांना ३० लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी उमेदचे तालुका व्यवस्थापक योगेश जगताप, उमेदचे श्री. शेवाळे, कृषि विभागातील मनोज बोबडे, बिटरगाव श्री येथील ग्रामसेवक श्री. निकम, बँक ऑफ महाराष्ट्रचे बँक मॅनेजर मोहन कुमार, बँक ऑफिसर अविनाश पेंटे, BC कुलकर्णी, बँक सखी अश्विनी घोडके, ICRP नूतन शिंदे, उषा आढाव, प्रियांका शिंदे, माया शिंदे, मनिषा दळवी, कृषि सखी ताई पाटील व समुहातील महिला उपस्थित होत्या.


