बुथ बैठकीच्या कामकाजाने करमाळ्यात ‘कमळ’ फुलले : गणेश चिवटे

Lotus blossomed in Karmala through the work of the booth meeting Ganesh Chivte

करमाळा (सोलापूर) : भाजपच्या बुथ बैठकीच्या कामकाजाने करमाळा तालुक्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा खासदार करण्यासाठी चांगले वातावरण तयार झाले असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी केले आहे.

भाजप महायुतीचे उमेदवार खासदार निंबाळकर यांच्या प्रचारार्थ चिवटे यांनी तालुक्यात गावागावात बुथ समितीच्या बैठक घेतली आहे. या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. चिवटे यांनी तालुक्यात 80 गावात बैठका घेतल्या आहेत.

चिवटे म्हणाले, निंबाळकर यांनी आतापर्यंत कोट्यावधीची विकास कामे केली आहेत. रिटेवाडी, पोंधवडी चारी व मांगी तलावासारखे पाण्याचे प्रश्न मार्गी लावतील यासाठी त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *