करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा निवडणुकीत भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरुद्ध कोण उमेदवार असणार याची उत्सुकता असतानाच निंबाळकर यांचे बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यातूनच सोमवारी (ता. २५) आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात तालुक्यातील कार्यकर्त्यांची गटनिहाय आढावा बैठक होणार आहे.

खासदार नाईक निंबाळकर, आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणाची आढावा बैठक होणार आहे. पांडे गटातील हिवरवाडी, पोथरे, बिटरगाव श्री, तरटगाव, पाडळी, घारगाव, बाळेवाडी, पोटेगाव, निलज, धायखिंडी, खांबेवाडी, देवीचामाळ, पांडे, भालेवाडी, करंजे, दिलमेश्वर, बोरगाव व वडाचीवाडी या गावांची बैठक सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे.

रावगाव गनांतील वंजारवाडी, रावगाव, लिंबेवाडी, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, कामोणे, मांगी, वडगाव, भोसे या गावांची आढावा बैठक पावणेदहा वाजता होणार आहे. वीट गटातील वीट, मोरवड, पिंपळवाडी, उमरड, अंजनडोह, झरे, देवळाली, रोशेवाडी, गुळसडी, खडकेवाडी या गावांची बैठक १० वाजता होणार आहे. कुंभेज गणातील कुंभेज, कोंढेज, वरकाटणे, सरफडोह, शेलगाव क, हिसरे, मिरगव्हाण, हिवरे, अर्जुननगर, फिसरे, गोंडरे, कोळगाव, निमगाव ह या गावांची बैठक सव्वा दहा वाजता होणार आहे.

कोर्टी गटातील कोर्टी घरतवाडी, कुंभारगाव, सावडी, गोरेवाडी, कुस्करवाडी, विहाळ, पोंधवडी, राजुरी, दिवेगव्हाण, वाशिंबे, उंदरगाव, रिटेवाडी, मांजरगाव, हुलगेवाडी या गावांची साडेदहा वाजता बैठक होणार आहे. केत्तूर गणातील देलवडी, भिलारवाडी, कावळवडी, रामवाडी, जिंती, भगतवाडी, गुलमोहरवाडी, हिंगणी, पारेवाडी, केत्तूर २ व १, खातगाव, पोमलवाडी, टाकळी व कोंढारचिंलोली या गावांची बैठक पावणेअकरा वाजता बैठक होणार आहे.

केम गटातील भाळवणी, पांगरे, केम, वडशीवणे, कविटगाव, कंदर, सातोली या गावांची बैठक ११ वाजता होणार आहे. साडे गणातील निंभोरे, साडे, मलवडी, घोटी, आळसुंदे, सालसे, आवाटी, नेर्ले, वरकुटे व पाथर्डी या गावांची बैठक सव्वाअकरा वाजता होणार आहे. वांगी गटातील शेटफळ, लव्हे, शेलगाव वा, दहिगाव, ढोकरी, वांगी १, २, ३ व ४, भिवरवाडी, सांगवी २, बिटरगाव वा या गावाची बैठक साडेअकरा वाजता होणार आहे. जेऊर गणातील पोफळज, केडगाव, सोगाव प व पू, गोयेगाव, कुगाव, चिखलठाण १ व २, जेऊरवाडी व जेऊर या गावांची आढावा बैठक पावणेबारा वाजता होणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *