करमाळा (सोलापूर) : येथील पवार हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. याचे उदघाटन हृदयरोग तज्ञ चंद्रकांत वीर यांच्या हस्ते झाले. यावेळी करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर, डॉ. रोहन पाटील, डॉ. श्रीराम परदेशी, डॉ. विठ्ठल पवार, टायगर ग्रुपचे डॉ. तानाजी जाधव यांच्यासह करमाळा मेडिकल असोसिएशन व करमाळा मेडिकोज गिल्डमधील पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. वीर म्हणाले, मनुष्य जीवन दुःखमुक्त करण्यासाठी डॉक्टर सेवा देत असतात. करमाळा येथे डॉ. रविकिरण पवार यांचे पवार जनरल हॉस्पिटल व विश्वराज हॉस्पिटल यांच्या वतीने घेण्यात आलेले महाआरोग्य शिबिर ही कौतुकाची बाब आहे. डॉ. दर्शन गौड, डॉ. प्रमोद सुर्वे, डॉ. विक्रम पाटील, डॉ. दर्शन गार्डे, डॉ. दोशी आदींनी रुग्णांची तपासणी केली.
करमाळा येथून सर्वसामान्य नागरिकांना तपासणीसाठी व शस्त्रक्रियासाठी पुणे, नगर व सोलापूरमध्ये जाऊन तपासणी करावी लागत आहे. यामध्ये वेळ व पैसा जातो. मात्र आता येथेही चांगल्या सुविधा मिळू लागल्या आहेत. शिबिराप्रसंगी डॉ. लावंड, डॉ. अविनाश घोलप, डॉ. अक्षय पुंडे, डॉ. सादिक बागवान, डॉ. अनुप खोसे, डॉ नागेश लोकरे, डॉ. पोपट नेटके, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. प्रशांत करंजकर, डॉ. विशाल शेटे, डॉ. महेश दुधे, डॉ. हर्षवर्धन माळवदकर, डॉ. राजेश तोरडमल, डॉ. विनोद गादिया, डॉ. संदीप महाजन, डॉ. निलेश जांभळे, डॉ. मेहेर, डॉ. संजय बुद्धवंन्त, प्रा. महेश निकत आदी उपस्थित होते. डॉ अजिंक्य पवार व डॉ. प्रज्वल खेडकर यांच्या शैक्षणिक यशप्रित्यर्थ व पवार जनरल हॉस्पिटलच्या नूतनीकरणानिमित्त हे शिबीर झाले.