करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या उजनी कुकडी उपसा सिंचन योजनेत सीना नदीच्या काटावरील तरटगाव, पोटेगाव व संगोबा बंधाऱ्याचा समावेश करावा अशीं मागणी तरटगाव येथील अजिंक्य पाटील यांनी केली आहे. याबाबतचे त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना निमगाव येथे भेट घेऊन निवेदन दिले आहे.

पाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे की, सरकारकडे प्रस्तावित असलेल्या भागासाठी वरदायिनी ठरणाऱ्या उजनी कुकडी उपसा सिंचन योजनेत तरटगाव, पोटेगाव व संगोबा येथील बंधाऱ्याचा समावेश व्हावा. फेब्रुवारी- मार्चनंतर या भागातील पाणी पातळी पूर्णतः खालावली जाते. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो, तसेच जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. या भागातील शेतकऱ्यांचा विचार व्हावा असे म्हटले आहे यावेळी आमदार शिंदे यांनी लवकरच याबाबत योग्य तो पाठपुरावा करून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *