करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभयसिंग जगताप यांचे नाव चर्चेत आहे. ते आज (सोमवार) करमाळा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी करमाळ्यात महाविकास आघाडी व राष्ट्रवादीने (शरद पवार गट) बॅनरबाजी केली आहे. करमाळ्यात ते पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अभयसिंग जगताप हे यांचे शिक्षण M. Tech. झाले असून ते उद्योजक आहेत. त्यांचे वडील १९८० ते ८५ दरम्यान माण तालुक्याचे सभापती होते. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विरुद्ध ते मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी आदेश दिला निवडणुकीत उतरणार असल्याचे यापूर्वीच त्यांनी जाहीर केले आहे. देशाचा विकास करणाऱ्या इंडीया आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी करमाळ्यात गायकवाड चौकात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी स्वतंत्र बॅनर लावला आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीनेही स्वतंत्र बॅनर लावला आहे. या बॅनरवर राष्ट्रवादीची गटबाजी दिसून येत आहे.