करमाळा (अशोक मुरूमकर) : पडत्या काळातही करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला असून येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणूकीसाठी आपण तयारी सुरु करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

करमाळा विधानसभा निवडणुकीत दिग्विजय बागल हे महायुतीचे उमेदवार होते. त्याचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांना साधारण ४१ हजार मते मिळाली आहेत. बागल म्हणाले या निवडणुकीत उतरण्याचे माझे निश्चित नव्हते. शेवटच्या क्षणी माझे नाव पुढे आले आणि मी निवडणूक लढवली. हा पराभव मी मानत नाही. कमी कालावधी मिळालेला असतानाही मला मतदारांनी स्वीकारले आहे. येणाऱ्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्याला प्राधान्य देणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, माजी संचालक रमेश कांबळे, संचालक सतीश नीळ आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बागल म्हणाले, महायुती सरकारच्या माध्यमातून कारखाने सुरळीत करण्यावर भर दिला जाणार आहे. काही दिवसांपासून आमचा मतदारांशी संपर्क कमी झाला होता. आम्हाला काहींनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यात शेवटच्या क्षणी माझे नाव निश्चित झाले. आमच्या नेत्या रश्मी बागल व मार्गदर्शक विलासराव घुमरे यांची यात खूप मोठी मदत मिळाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *