करमाळा (सोलापूर) : वंचित बहुजन आघाडी करमाळा व माढा लोकसभा विभागाच्या वतीने सोमवारी (ता. १५) कुंभेज फाटा येथे मजलुम एकता परिषद होणार आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माढा विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुलजी चव्हाण हे आहेत. तरी माढा लोकसभा विभागातील सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हाळ व करमाळा शहर अध्यक्ष विशाल लोंढे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुक्यातील व माढा विभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक तालुका उपाध्यक्ष अजय पवळ व सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र चव्हाण यांनी केले आहे.



