Under the leadership of former MLA Narayan Patil in Karmala the branches of Yuva Sena will be rebuilt in all the wards

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरामध्ये लवकरच युवा सेनेची पुर्नबांधणी करून सर्व वॉर्डामध्ये शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा उघडून प्रत्येक वॉर्डात सदस्य नोंदणीसुरू करणार असल्याचे युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी राजमाता माँ साहेब जिजाऊ यांची जयंतीच्या अनुषंगाने करमाळा येथे केले.

यावेळी युवा सेनेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती किल्ला वेस येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, न्यायालयाने, निवडणूक आयोगाने व विधानसभा सभापती मिलिंद नार्वेकर यांनी ही शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच अधिकृत असल्याचे निरीक्षण नोंदवून निकाल दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य हे समाजाभिमुख असून त्यांच्या कार्याच्या प्रेरणेने अनेक युवक युवा सेनेत प्रवेश करण्यास उत्सुक असल्याने करमाळा शहरातील सर्व वॉर्डात लवकरच शाखा उघडून युवकांना युवा सेनेत सामील करून घेणार आहे.

युवा सेनेच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या हक्क व प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारी फळी तयार करणार असल्याचे ही गायकवाड यांनी सांगितले. यासाठी शिवसेना माजी आमदार नारायण पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, शिवसेना तालुका प्रमुख देवानंद बागल यांचे अनमोल मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी युवा सेना तालुका उपप्रमुख दादासाहेब तनपुरे, प्रसिध्द उद्योजक प्रफुल्ल शिंदे, वासुदेव ढोके, अक्षय गायकवाड, गणेश पवार, प्रशांत शिंदे, अजय शिंदे, भोलेनाथ ननवरे, शिवराज काळे, आदेश नरूटे, विशाल काकडे आदी युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *