करमाळा (सोलापूर) : तालुक्याच्या पुर्व भागातील फिसरे ते कोळगाव रस्ता त्वरीत करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी दिला आहे. घोलप म्हणाले, या रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे की, नागरीक कसे ये जा करतात हेच विषेश आहे. संबंधित भागातील लोकप्रतिनिधी त्या संदर्भात दुर्लक्ष दिसते रस्ता खराब असल्यामुळे तेथील शेतकरी करमाळा बाजारपेठऐवजी परांडा बाजारपेठेत जातात. यामुळेच करमाळा तालुक्यातील शेतकरीबाहेर तालुक्यात गेला तर आपले व्यापारी कसे दुकाने चालणार त्यामुळेच लवकर रस्ता तयार करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळाच्या वतीने करणार, अशी माहिती घोलप यांनी दिली.

