करमाळा (सोलापूर) : मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून कायमस्वरूपी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असून मला विधानसभेत पाठवा, असे आवाहन करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ यांनी पोथरे येथे केले आहे.
पोथरे येथे झालेल्या सभेवेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, आदिनाथचे माजी संचालक लालासाहेब जगताप, काँग्रेसचे हरीभाऊ मंगवडे, वंचितचे साहेबराव वाघमारे, गफूर शेख, आनंद झोळ, रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, सुदर्शन शेळके, निवृत्ती साखरे, अनिरुद्ध झोळ, श्रीकांत साखरे आदी उपस्थित होते.
प्रा. झोळ म्हणाले, कुकडीचे हक्काचे पाणी कर्जत तालुक्यातील गावांना सोडण्यात येते. हेच पाणी उजव्या कालव्याद्वारे मांगी तलावात सोडल्यास या तलावाखालील मांगी, वीट, मोरवड, पिंपळवाडी, झरे, पुनवर, वडगाव, रावगाव, वंजारवाडी, जातेगाव, हिवरवाडी, भोसेतील पाझर तलावातुन पोथरे, बिटरगाव, निलज, धायखिंडी, खांबेवाडी, करंजे, भालेवाडीला मांगी तलावातुन पाणी पुरवठा होऊन येथील शेतकरी समृद्ध होऊ शकतो. पाणी प्रश्न बरोबर शिक्षणासाठी देवळाली येथे शैक्षणिक संकुल उभा करणार आहे. आरोग्याबाबतही सर्व सोयीनिमित्त मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले.
शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष कांबळे म्हणाले, ‘पुढारी सोयीचे राजकारण करत असून आपसात सत्तेची वाटणी करून, आपल्या पुढील पिढीचे भवितव्य उज्वल करण्यासाठी धडपड करत आहेत. पुन्हा तुमच्या मुला बाळाची चिंता नाही पण त्यांना भीती आहे की, हे शिकले तर आपल्या मागे कोण येणार? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहकार्य करणारा प्रा. रामदास झोळ एकमेव असे व्यक्ती आहेत की, त्यांनी निवडणुकीच्या आधी म्हणून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस पासून ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. स्व. नामदेवराव जगताप यांच्यानंतर एकही शैक्षणिक संस्था येथे उभी झाली नाही. गट- तटाच्या राजकारणात भावनिक बोलण्याला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.
सभेसाठी संतोष वाळुंजकर, अशोक जाधव, काशीम शिंदे, तुकाराम खाटमोडे, बाळासाहेब ठोंबरे, विजय झिंजाडे, राज झिंजाडे, प्रा. आजिनाथ झिंगाडे, रमेश आमटे, मारुती लाडाने, विजय शिंदे, दादा शिंदे, जुबेर शेख, संतोष मोरे, रमेश आमटे, गणेश खाटमोडे, परशुराम खाटमोडे, हर्षद खाटमोडे, अंकुश तळेकर, काका पाडुळे, भाऊसाहेब झिंजाडे, महादेव शिंदे, राजू खाटमोडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीकांत साखरे पाटील यांनी केले तर आभार गोपीनाथ पाटील यांनी मानले.