करमाळा (सोलापूर) : सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को- ऑपरेटिव्ह फेडरेशन संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक मानसिंग खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. नारायण खंडागळे यांचे ते चिरंजीव आहेत. संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणूक 10 जानेवारी जाहीर झाली होती. त्यानुसार 18 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. 19 तारखेला अर्जाची छाननी होऊन 5 फेब्रुवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मुदत होती. नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार शिंदे यांच्या सूचनेनुसार करमाळा तालुक्यातून अर्ज दाखल केलेले दादासाहेब सावंत, शिवशंकर माने व बापूराव गायकवाड यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने खंडागळे हे बिनविरोध झाले आहेत.

