लोकमंगल बँक व सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी करमाळ्यात मराठा उद्योजक मेळावा

करमाळा (सोलापूर) : आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनाबाबत लाभार्थी व बँक अधिकाऱ्यांशी संवाद करण्यासाठी महामंडळ थेट आपल्या दारी या संकल्पनेतून लाभार्थ्यांचे प्रश्न करमाळा येथे येऊन सोडवण्यासाठी करमाळा येथे लोकमंगल नागरी सहकारी बँक व सर्वोदय प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी (ता. 4) सकाळी १० वाजता करमाळ्यातील विकी मंगल कार्यालय येथे ‘मराठा उद्योजक मेळावा’ होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, हे असणार आहेत. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे समन्वयक तथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व संघटन मंत्री अभिजीत पाटील व माजी नगरसेवक अॅड. गजानन भाकरे हेही उपस्थित राहणार आहेत. करमाळा तालुक्यातील नव उद्योजक तरुणांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक दीपक चव्हाण व शिवाजी पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *