करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत करमाळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित गावाच्या सरपंचांनी ठराव करावेत. याबाबत करमाळ्याचे तहसीलदार यांना सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांनी आज (सोमवारी) निवेदन दिले आहे. यावेळी विविध गावातील मराठा समाज बांधव उपस्थित होते.
मराठा आरक्षण या मुद्द्यावर अतिशय संवेदनशीलपणे सर्वत्र काम सुरु आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या सरपंचांनी व माजी सरपंचांनी तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व गावातील विविध पक्ष, संघटना सामाजिक संघटना व शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मराठा बांधवांनी सक्रीयपणे कार्यरत रहावे. या लढ्यामध्ये सर्वसामान्य बहुजन बांधवसुद्धा सहभागी आहेत. याचाच एक भाग म्हणून करमाळा तालुक्यातून सर्वच्या सर्व ग्रामपंचायतनी मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे याशिवाय सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांना व आपण निवडून दिलेल्या आमदारांना व खासदारांना लोकशाही पद्धतीने निवडून गेलेल्या सर्वच राजकीय पुढार्यांना गावबंदी 100 करावी, असे यावेळी उपस्थित बांधवानी सांगितले आहे.
वडगाव दक्षिण व देवळाली येथे यातूनच सकल मराठा समाज व बहुजन बांधव तसेच ग्रांपचायतच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात बैठक झाली त्यांनी यावेळी निवेदन दिले आहे. पोथरे येथे यापूर्वीच निर्णय घेऊन निवेदन देण्यात आले होते.