करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खांबेवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप व वृक्षरोपण करण्यात आले. नारायण आबा पाटील मित्र मंडळच्या वतीने हा कार्यक्रम झाला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, पांडेचे उपसरपंच आदिनाथ शिंदे, उद्योगपती थाभाऊ नरूटे, तात्यासाहेब शिंदे, बबलू कोळेकर, चकोर नरूटे, अमोल वायकुळे, गोरख हाके, पिनू कोळेकर, सुशील नरूटे, रुपेश लांडगे, नवनाथ शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक पोपट पाटील, सहशिक्षिका गायकवाड उपस्थित होते.
माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खांबेवाडीत वृक्षारोपण
