करमाळा तालुका क्रीडा स्पर्धांबाबत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बैठक

Meeting at Yashwantrao Chavan College regarding Karmala Taluka Sports Competitions

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने करमाळा तालुका क्रीडा स्पर्धांबाबत महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये बैठक झाली. यामध्ये करमाळा तालुका क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्यात आले.

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, नदीम शेख, श्री. धारूरकर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा तालुका क्रीडा समन्वयक प्रा. राम काळे यांनी केले तर सूत्रसंचालन नेताजी सुभाष विद्यालयाचे किशोर जाधवर यांनी केले. उपस्थितांचे आभार श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाचे डी. एम. बरडे यांनी मानले. कोर्टी येथील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूलचे चंद्रकांत भिसे यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *