करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील नेर्ले येथे आज (बुधवार) पहाटे ४ वाजून २ मिनिटाने भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही. याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनीही या भागातील नागरिकांकडून माहिती घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेर्ले येथील अजित सावंत यांनी म्हटले आहे की, ‘आज पहाटे ४.२ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. घरामध्ये ठेवण्यात आलेल्या भांड्यांचाही हल्ल्याला आवाज आला. त्यानंतर नागरिकांनी एकमेकांशी सवांद साधला. दरम्यान गावातील एका व्हॉट्सअप ग्रुपवरही चर्चा झाली. सालसे परिसरात याचवेळी चोर आल्याची चर्चा होती. मात्र हा भूकंपाचा धक्का असल्याचा निष्कर्ष निघाल्याचे त्यांनी सांगितले.’ याबाबत तहसीलदार ठोकडे यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान नागरिकांनी सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. हा भूकंप की अफवा हे समजू शकलेले नाही. मात्र नागरिकांनी याबाबत योग्य ती काळजी घ्यावी.
