विकास निधी आणण्यासाठी आमदार पाटील ऍक्शन मोडवर! कृषी संशोधन केंद्रासाठी मुंबईत कृषी मंत्र्यांची भेट, नवीन एसटी बससाठीही पाठपुरावा

MLA Narayan Patil in action mode to bring development funds

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात शेलगाव (वां) येथे केळी संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मंजुरी मिळावी यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदार नारायण पाटील यांनी भेट घेतली आहे. त्यांनी करमाळा आगाराला नवीन एसटी बस मिळाव्यात यासाठीही सरकारकडे पाठपुरावा सुरु केला आहे.

करमाळा तालुक्यात केळीचे क्षेत्र वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यात केळीसाठी चांगले वातावरण आहे. याचा विचार करून करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र गरजेचे आहे. तालुक्यात निर्यातक्षम केळीचे उत्पादन होऊन आखाती देशाबरोबरच युरोपीयन देशमध्येही निर्यात होत आहे. २०२१- २२ मध्ये ६ हजार ७३१ हेक्टर व २०२२- २३ मध्ये ६ हजार ९७८ हेक्टर व २०२३- २४ मध्ये ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. हे सरासरी उत्पादकता ६९ टन प्रति हेक्टर आहे.

करमाळा तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेज व पॅक हाऊसची संख्या नऊ असून त्याची साठवण क्षमता २५ हजार मेट्रीक टन आहे. कंदर, वाशिंबे, वरकटणे, जेऊर येथून ८ हजार कंटेनरमधून १ लाख ६० हजार मे. टनाच्या केळीची निर्यात झाली आहे. केळीवर प्रक्रिया करून वेफर्ससह इतर उत्पादन काढली जातात. परंतु केळीसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याने कुशल मजुरासाठी प्रशिक्षण केंद्र, मृदा व जलपरीक्षण केंद्र, खत तपासणी प्रयोगशाळा, नवनवीन वाणाची निर्मिती व दर्जेदार रोपांची निर्मिती होण्यासाठी केळी संशोधन केंद्राची व ऊती संवर्धन प्रयोगशाळेची आवश्यकता आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *