करमाळा (अशोक मुरूमकर) : भगतवाडी व गुलमोहरवाडी येथे रविवारी (ता. २६) आमदार नारायण पाटील यांच्या विकास निधीमधून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. आमदार पाटील यांच्या हस्ते हे भूमीपूजन होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले, सरपंच राधाबाई भागडे उपस्थित राहणार आहेत. आमदार पाटील यांच्या विकासनिधीतून भगतवाडी येथे सात लाखाचा अंतर्गत सिमेंट रस्ता, गोलमोहरवाडीत सात लाखाचा अंतर्गत रस्ता, विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर आठ लाखाचे सभागृह, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती व गिरंजे वस्ती येथे सिंगल फेज विद्युत ट्रान्सफार्म मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन रविवारी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भगतवाडी व गुलमोहरवाडीत आमदार पाटील यांच्या हस्ते उद्या विकास कामांचे भूमिपूजन
