करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांचा करमाळासह माढा तालुक्यातील 36 गावात जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचार दौऱ्यादरम्यान आमदार शिंदे यांनी टीकाटिप्पणी न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावर आपण महाविकास आघाडी व त्यानंतर महायुतीसोबत असून करमाळा मतदारसंघाच्या विकास कामासाठी जवळपास 2500 कोटीहून अधिक निधी प्राप्त केला असल्याचे ठामपणे सांगतात. आपल्याला मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्तेसोबत रहायला हवं ही आपली भूमिका आहे, असे ते सांगत आहेत.
2019 ते 2024 ही पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासातील आगळीवेगळी निवडणूक आहे. प्रारंभी सरकार स्थापन व्हायला लागलेला वेळ, त्यानंतर कोरोनामध्ये गेलेला 2 वर्षाचा काळ, सर्व स्थिरस्थावर होऊन विकास कामे सुरू असताना महाविकास आघाडीचे कोसळलेले सरकार आणि त्यानंतर विरोधात आपण घालवलेले जवळपास 1 वर्ष यामुळे करमाळा तालुक्याच्या विकासाला अडसर निर्माण झाला होता. त्यामुळे फक्त तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण अजितदादाच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये सामील झालो. पर्यायाने अवघ्या 1 वर्षात मतदार संघाला तब्बल 1 हजार कोटीहून अधिक निधी मंजूर झाला त्यामुळे तालुक्याचा शाश्वत विकास होण्यास हातभार लागत आहे ही आमदार संजयमामा शिंदे यांची मांडणी मतदारांना खूप भावत आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजना व माढा तालुक्यातील सीना माढा उपसा सिंचन योजना या दोन्ही योजना ची सुरुवात 1995 साली झाली परंतु दहिगाव उपसा सिंचन योजना तब्बल 2018 साली कार्यान्वित झाली तर सीना माढा उपसा सिंचन योजना मात्र 2001 सालीच कार्यान्वित झाली. हा नेत्याच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्यामुळे आपण फक्त विकासालाच प्राधान्य देतो. त्यामुळे विकासाला साथ द्या व कमळाला मत द्या हे आमदार संजयमामा शिंदे यांचे आवाहन मतदारांना प्रभावित करते.
तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी मिळाला
भूसंपादन – 70 कोटी.
अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठी -350 कोटी.
जातेगाव टेंभुर्णी रस्त्यासाठी -1200 कोटी
दहिगाव उपसा सिंचन योजना – 116 कोटी
आरोग्य विभाग – 76 कोटी
राशीन जिल्हा हद्द सावडी ते वेणेगाव फाटा रस्ता – 271कोटी.
कृषी विभाग – अतिवृष्टी, सततचा पाऊस व दुष्काळी अनुदान – 347 कोटी