MLA Sanjay Shinde is trying to mislead the opposition about the development works

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी 3 हजार 490 कोटी निधी आणला आहे याचे सर्व पुरावे आहेत. मात्र याची खिल्ली उडवली जात असून विरोधक दिशाभूल करत आहेत. लोकशाहीत कोणत्याही कामाची सुरुवात कागदोपत्रीच होते, असे आमदार संजयमामा शिंदे म्हणाले आहेत.

‘विकास हा रेडिमेड नसतो त्याची सुरुवात कागदावरूनच होत असते. कुठलीही विकासप्रक्रिया सर्वप्रथम कागदावर येते. त्यानंतर त्याचे सर्वे होतात आणि मग त्याची अंमलबजावणी सुद्धा कागदाच्या शासकीय अध्यादेशाद्वारेच होते, असे ते म्हणाले आहेत. अर्जुननगर येथील कॉर्नर बैठकीत आमदार शिंदे यांनी हे विरोधकांच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.

करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना हा निधी कसा आला हे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र विरोधक नकारात्मक प्रचार करत आहेत. हे मतदारांना सुद्धा पटत नाही. जातेगाव ते टेंभुर्णी या रस्त्यासाठी मिळालेले 1 हजार 246 कोटी, हॅमअंतर्गत रस्ते विकासासाठी 271 कोटी, कुगाव ते शिरसोडी या पुलाला मिळालेले 382 कोटी, डिकसळ पुलाला मिळालेले 55 कोटी याबरोबर बजेट, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, नाबार्ड, 3054 गट ब आदी माध्यमातून रस्ते विकासासाठी व पूल बांधणीसाठी तब्बल 2 हजार 70 कोटीपेक्षा अधिक निधी मिळाला आहे.

आरोग्यच्या बाबतीत उपजिल्हा रुग्णालय, कर्मचारी वसाहत, प्रशासकीय संकुल, करमाळा नगरपरिषद इमारत, सांस्कृतिक भवन, कुर्डूवाडी येथे ट्रामा केअर सेंटरसाठी 150 कोटी निधी मिळाला. कुर्डूवाडी नगरपरिषद अंतर्गत झालेल्या विकास कामांसाठी 100 कोटी निधी मिळाला, दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी 116 कोटी निधी मिळाला, भूसंपादन, अल्पसंख्यांक विभाग, समाज कल्याण विभाग, आमदार फंड, 2515, पुनर्वसन विभाग, जलसंधारण विभाग या माध्यमातून मिळालेला निधी हा 200 कोटींपेक्षा अधिक आहे.

2009 ते 14 या कालावधीत 900 कोटी तर 2014 ते 19 या कालावधीत 1300 कोटीची विकास कामे केल्याचे तत्कालीन आमदारांनी सांगितले. त्यांच्या या निधीपेक्षा जवळपास दुप्पट, तिप्पट निधी 2019 ते 24 मध्ये आमदार शिंदे यांनी आणलेला हाच निधी विरोधकांना पचत आणि रुचत नसल्यामुळे अत्यंत खालच्या पातळीवरती आमदार शिंदे यांच्यावरती टीका होत असल्याबद्दल मतदारात चर्चा सुरू आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *