Four goats killed nine injured in attack by stray dogs in PandeFour goats killed nine injured in attack by stray dogs in Pande

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पांडे व म्हसेवाडी परिसरामध्ये मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याची टोळी सक्रिय झाली आहे. कुत्र्यांनी चार शेळ्या ठार मारल्या असून नऊ शेळ्या जखमी केल्या आहेत. पंधरा दिवसांपासून पाच ते सहा फिरस्ती कुत्र्यांची ही टोळी आली आहे. या परिसरातीत कुत्र्यांची टोळीने बिबट्याप्रमाणे पुर्व भागात धुमाकूळ घालुन दहशत माजवली आहे. दिवसा व रात्री शेळ्यावर हल्ला करून शेळ्या ठार मारीत आहेत.

शेतामध्ये व शिवारात चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्या व शेतामध्ये बांधलेल्या रात्री शेळ्या हल्ला करून चार शेळ्या ठार मारल्या आहेत. तर नऊ शेळ्या जखमी केल्या आहेत. हि फिरस्ती कुत्री शेतकरीच्या अंगावर चाल करीत आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये घबराटीचे वातावरण होऊन लोक भयभीत झाले आहेत. संजय लोखंडे, दुत पाडुळे, पांडुरंग पाडुळे, सुनिल ननवरे, बाबा भगत, दतु राऊत, सोमा लोखंडे या शेतकरीच्या शेळ्या ठार मारल्या आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *