करमाळ्यातील दहिहंडी उत्सवाला आमदार शिंदे यांची भेट

MLA Sanjaymama Shinde visit to Dahihandi festival in Karmala

करमाळा (सोलापूर) : राज्यात आज (मंगळवारी) सर्वत्र मोठ्या उत्सहात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. करमाळ्यात देखील मोठ्या उत्सहात गोविंदांकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असून या उत्सवाला आमदार संजयमामा शिंदे यांनी भेट दिली आहे. दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडीला भेट दिली तेव्हा आमदार शिंदे यांचे मंडळाने स्वागत केले. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नानासाहेब मोरे, पंचायत समितीचे माजी सभापती बापुराव गायकवाड, मांगी सोसायटीचे अध्यक्ष सुजित बागल, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, श्री. परदेशी, श्री. टांगडे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व गोविंदाना आमदार शिंदे यांनी शुभेच्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *