करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दिलीप धोत्रे व प्रशांत गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या चिन्हावर लढणार आहे, अशी माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे, तालुका उपाध्यक्ष अशोक गोफणे, राजाभाऊ बागल, शहराध्यक्ष सतीश फंड, शहराध्यक्षा संगीता क्षिरसागर, आबासाहेब जगताप, आनंद मोरे, श्रीकांत चव्हाण, सचिन कणसे, गजु कांबळे, सोनु फुटाणे, स्वप्निल कवडे, योगेश काळे, नागेश दुघाट, राजेंद्र क्षिरसागर, कल्याण इंदलकर, गणेश काळे, बाळासाहेब वीर, भावना गांधी, स्वाती जाधव, मोनिका म्हलारे अदी उपस्थित होते.
