खासदार मोहिते पाटील यांच्याकडून तरटगाव बंधाऱ्याची पहाणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची पहाणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली. तरटगाव बंधाऱ्यावर ट्रॅक्टरने जाऊन त्यांनी ही पहाणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सूचना केली. यावेळी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. अमोल घाडगे, ऍड. राहुल सावंत, अमरजित साळुंखे व सचिन नलवडे, युवराज देवकर आदी उपस्थित होते.

सीना नदीला आलेल्या पाण्यामुळे खडकी येथील कोल्हापूर पद्धतीचा लघु पाटबंधारा वाहून गेला आहे. तरटगाव बंधाऱ्याचे बिटरगाव श्री हद्दीत नुकसान झाले आहे. भारावचा मुरूमही वाहून गेला आहे. याकडे वेळीच लक्ष नाही दिले तर भविष्यात धोका होऊ शकतो. परिसरातील शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. नदी काटावरील शेतीचे मोठे नुकसान झाले असून त्यांना मदत देण्यासाठी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. याची पहाणी खासदार मोहिते पाटील यांनी केली.

तरटगाव बंधाऱ्यावर जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने जाण्याची व्यवस्था केली होती. करमाळा- जामखेड रस्त्यावरील तरटगाव फाटा येथून पाहणीसाठी मोहिते पाटील व इतर पदाधिकारी ट्रॅक्टरने आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *