A twoday farmer study tour by farmer members on behalf of Raje Ravrambha Shetkari Producer Company

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या वतीने शेतकरी सभासदांचा दोन दिवशीय शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या अभ्यास दौऱ्यात सौंदे, गुळसडी, सरपडोह, शेलगाव क, चिखलठाण व तरटगाव येथील 115 महिला व पुरुष शेतकरी सहभागी झाले होते.

अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठातील सुरू असणारे नाविन्यपूर्ण प्रयोग पाहिले. विद्यापीठाअंतर्गत वेगवेगळ्या विभागांना भेटी देऊन त्यांची माहिती घेतली. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये अग्रगण्य विद्यापीठ म्हणून राहुरी कृषी विद्यापीठाचा उल्लेख केला जातो. या विद्यापीठातील सिंचन व्यवस्थापन विभाग, अवजारे विभाग, भाजीपाला, फळबाग, नर्सरी, डेअरी फार्म, नवीन वाण संशोधन केंद्र असे वेगवेगळे विभाग जवळपास 3200 एकर क्षेत्रावर ती काम करत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांनी घेतली.

शेतकऱ्यांनी सह्याद्री फार्म नाशिकलाही भेट दिली. कंपनीतील फार्मर फॅकल्टी सेंटर, माती संशोधन केंद्र, प्रक्रिया उद्योग, केळी टिशू कल्चर लॅब यांना भेट देऊन माहिती जाणून घेतली. पाणी फाउंडेशनने सह्याद्री कंपनीवर बनवलेला माहितीपट सभागृहांमध्ये शेतकऱ्यांनी पाहिला. या सभागृहात कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

सह्याद्री कंपनीने द्राक्ष पिकावर मूलभूत काम केले. तसेच काम केळी पिकावर तुम्ही करावं. करमाळा तालुक्यात केळी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. ही केळी फक्त अरब राष्ट्रांपुरती मर्यादित न राहता युरोप आणि जपान सारख्या देशांमध्येही निर्यात झाली पाहिजे, या दृष्टीने विषविरहित गुणवत्तापूर्ण उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *