करमाळा (सोलापूर) : खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट घेतली आहे. यावेळी जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. ‘माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मोहिते पाटील कुटुंबीयांच्या अडचणीच्या काळात मदत केलेली आहे. त्याचे मोहिते पाटील कुटुंबियातील तिसऱ्या पिढीला स्मरण असून त्याची उतराई करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही’, अशी ग्वाही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे.
खासदार मोहिते पाटील हे करमाळा दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात माजी आमदार जगताप यांची भेट घेतली. आदिनाथचे माजी संचालक अंकुश साखरे, माजी आमदार नारायण पाटील यावेळी उपस्थित होते. ‘जिल्ह्याच्या राजकारणात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व देशभक्त नामदेवराव जगताप यांच्यात तात्विक मतभेद होते. मात्र जिल्हयाच्या विकासात्मक कामासाठी ते वेळोवेळी एकत्र येत होते, असे माजी आमदार जगताप म्हणाले.
१९६२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत व २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील आणि २०२४ मध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळा तालुक्यातील नागरिकांनी विजयी करण्यात योगदान दिले. त्यांनी विकास कामांमध्ये करमाळा तालुक्याला झुकते माप देणेबाबत आवाहन केले. माजी आमदार जगताप यांनी माजी आमदार पाटील यांच्याकडे पाहत करमाळा तालुक्याच्या राजकारणात ज्यावेळी दोन सुवासिनी एकत्र येतात त्यावेळी निश्चितच निकाल चांगला लागतो, असे म्हटले.
याप्रसंगी करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मनोहर गुंडगिरे, दादासाहेब कोकरे, वैजिनाथ कदम व संभाजी रिटे यांची निवड झाल्याबद्दल मोहीते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, माजी नगरसेवक अतुल फंड, श्रेणिक खाटेर, नजीर अहमद शेख, बाजार समितीचे उपसभापती बबन मेहेर, संचालक महादेव कामटे, नागनाथ लकडे, आण्णासाहेब पवार, शिवाजी राखुंडे, जनार्दन नलवडे, रामदास गुंडगिरे, सागर दोंड, मनोज पितळे, परेश दोशी, माजी संचालक दादासाहेब जाधव, औदूंबर मोरे, मयूर दोशी, देवानंद बागल, खरेदी विक्री संघाचे संचालक महादेव डुबल, दादासाहेब लबडे, शहाजी शिंगटे, हनुमंत ढेरे, आदिनाथचे प्रशासकिय संचालक ॲड. दीपक देशमूख, अजित तळेकर, बापू रिटे, डॉ. अमोल घाडगे, अमरजित साळुंखे उपस्थित होते. प्रास्ताविक दत्तात्रय भागडे यांनी तर आभार यूसूफ शेख यांनी मानले.