करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा दौऱ्यावर आल्यानंतर करमाळा भाजपच्या महिला अघाडीच्या शहराध्यक्ष संगीता नष्टे यांच्या निवासस्थानी सपत्नीक भेट दिली. यावेळी ओबीसी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रुपाली ननवरे, अनुराधा राजमाने, दुर्गा राजमाने, कविता विभुते, प्रियंका राजमाने, देविदास नष्टे, भाजपचे राजकुमार पाटील, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, सरचिटणीस सुहास घोलप, जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत पवार आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.



