करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सपत्नीक करमाळ्यातील भाजपचे सुहास घोलप यांच्या घरी कौटुंबिक भेट दिली आहे. यावेळी खासदार निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर,माढा लोकसभा मतदार संघाचे प्रभारी राजकुमार पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, राज्य निमंत्रित सदस्य दीपक चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कुंभार, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष जितेश कटारिया, माजी सभापती बापूराव गायकवाड, भिवरवाडीचे श्री. शेळके, नितीन घोडेगावकर, नितीन कांबळे, ऍड. प्रियल अगरवाल, वनराज घोलप, वैभव सपकाळ, संघर्ष दयाळ, संग्राम दयाळ, माजी महिला प्रमुख भाग्यश्री कुलकर्णी, अधिराज घोलप, शार्दुल घोलप आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

