करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार धनश्री दळवी यांनी आज (शनिवार) केत्तूर नाका येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करमाळा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरु केला. दळवी या प्रभाग क्रमांक 9 अ मध्ये उमेदवार आहेत. त्यांनी प्रचार सुरु केला आहे. प्रचार फेरीमध्ये त्यांनी मतदारांना विकास करण्यासाठी विजयी करा, असे आवाहन केले. यावेळी त्यांना नागरिकांनी अडीअडचणी सांगितल्या. यावेळी त्यांना नागरिकांनी अडीअडचणी सांगितल्या. यावेळी त्यांना नागरिकांनी अडीअडचणी सांगितल्या. त्या नक्कीच सोडविण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पत्रकार जयंत दळवी यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रभागातील अनेकजण उपस्थित होते.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दळवी यांचा प्रचार सुरु
