Need for proper guidance for better health of women Saili Patil

करमाळा (सोलापूर) : महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असुन माजी आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळाने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. सायली पाटील यांनी केले. जेऊर येथील जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या महिला महोत्सवाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.

माजी आमदार नारायण आबा पाटील मित्र मंडळ व जेऊर ग्रामपंचायतच्या वतीने ‘महिला महोत्सव’ झाला. यामध्ये पाककला, रांगोळी, वक्तृत्व, अभिनय, वेशभुषा, डान्स, अंताक्षरी, फनी गेम्स स्पर्धा झाल्या. यातील विजेत्यांना बक्षीसे देण्यात झले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतीताई पाटील होत्या. यावेळी अनिता जगताप, जयश्री दळवी, रत्नमाला बादल, उषा सरक, विजया भोसले, सुनिता पाटील, प्रेमलता दोशी, सुचिता राठोड, अनिता दोशी, नंदा गादिया, नंदा तळे, विजया कर्णवर, रोहिणी सुतार, सुलभा घाडगे, जनाबाई कांबळे, भारती बलदोटा, ताहिरा शेख, राजश्री दोशी, वैशाली दोशी, वैशाली कोठारी उपस्थित होत्या.

डॉ. सायली म्हणाल्या, करमाळा तालूक्यातील नागरिकांचे विशेष करुन महिला भगिनींचे आरोग्यमान उंचावण्यासाठी त्यांना आरोग्यविषयक माहिती उपक्रमाच्या माध्यमातून दिली पाहिजे. कॅन्सर सारख्या आजारांना पहिल्या पायरीवर थोपवता येते अथवा त्यापासुन मुक्ती मिळवता येते. परंतु यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी आपण वेळ देणार असुन एक सामाजिक बांधिलकी म्हणुन आपल्या शिक्षणाचा सदुपयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहिणी सुतार, यास्मीन शेख, संध्या हेळकर, साधना लुणावत, अपर्णा पाथ्रुडकर, रेखा तोरमल, प्रिया सोळंकी यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत जेऊरच्या वतीने विजेत्या महिलांना आकर्षक भेट वस्तु आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. रिया सुतार हिने सुत्रसंचलन केले तर कृष्णाई मोटे हिने आभार मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *