करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील निंभोरे ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच रविंद्र वळेकर व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. करमाळा येथील विठ्ठल निवास येथे हा सत्कार झाला. यावेळी सरपंच वळेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य समाधान वळेकर, अनिता पाटील, पुतळा सावंत, पार्वती वळेकर, दीपक गवळी व आशा वळेकर यांच्यासह भारत मारकड, सम्राट जाधव, बापु मोरे, बळीराम सांगडे, ज्योतीराम वळेकर, माजी सरपंच अविनाश वाघमारे, भारत सांगडे, दादा बागल, भारत अडसूळ, पंजाब गाडे, दत्ताभाऊ वळेकर, लक्ष्मण वळेकर, नाथा शिंदे, राज पठाण, रामा नाईक, धनंजय सांगडे, हरी वळेकर, हनुमंत वाघमारे व तुकाराम मस्के उपस्थित होते. यावेळी निंभोरेच्या सर्वांगीन विकासासाठी मदत केली जाईल, असे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले आहे.

