करमाळ्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कात्रज व रिटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तर जिंती, भिलारवाडी व तरटगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नव्हता.

13 एप्रिलपर्यंत शासकीय सुट्या वगळून इच्छुकांना पारंपारिक पद्धतीने सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तहसील कार्यालय करमाळा येथे अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक होणाऱ्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष गोसावी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी कामकाज पाहणार आहेत. नामनिर्देशनपत्राची छाननी 15 तारखेला होणार असून उमेदवार अर्ज मागे घेण्याची मुदत 17 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तर मतदान 28 एप्रिलला असून मतमोजणी 29 एप्रिलला जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *