करमाळा (सोलापूर) : उजनी धरणामुळे पुनर्वसित झालेल्या करमाळा तालुक्यातील ३० गावांमध्ये नगरी सुविधा मिळाव्यात म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार सोमवारी (ता. ४ डिसेंबरला) दुपारी ४ वाजता करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक होणार आहे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सोपान टोंपे यांनी ही माहिती दिली आहे.
उजनी धरणामुळे करमाळा तालुक्यातील ३० गावे पुनर्वसित झाली आहेत. या गावांना १८ नागरी सुविधांचा लाभ मिळणे आवश्यक होते. मात्र आतापर्यंत एकाही गावात १८ सुविधांचा लाभ मिळालेला नाही. कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त सहा लाभ अद्यापपर्यंत मिळण्यापासून विस्थापित गावे वंचित आहेत. त्यामुळे आमदार शिंदे यांनी बैठक घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार ही बैठक होणार आहे, असे टोंपे यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.