करमाळा (सोलापूर) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा व सर्व संघटनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक बिभिषन जाधव, सुधीर गायकवाड, गावडे, कोकाटे, दीपक जव्हेरी यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे संघटक नागेश कांबळे, ॲड. महादेव कांबळे, दलित सेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, अर्बन बँकेचे व्यवस्थापक एस. पी. कांबळे, पाटबंधारे विभागाचे अभियंता गौतम कांबळे, नितीन कांबळे, बाबा घोडके, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, सुरेश भोसले, प्रमोद गायकवाड, सुरज कांबळे, भाऊ कांबळे, बबलू कांबळे, गेंदाप्पा कांबळे, दत्ता बडेकर, भीमराव कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व केंद्रीय शिक्षिका, उपासक, उपासिका व बौद्ध बांधव उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने करमाळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
